Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ पालिका निवडणूक मतमोजणीदरम्यान पत्रकारांचा मीडिया कक्षावर बहिष्कार, प्रशासनाविरोधात तीव्र संताप

भुसावळ पालिका निवडणूक मतमोजणीदरम्यान पत्रकारांचा मीडिया कक्षावर बहिष्कार, प्रशासनाविरोधात तीव्र संताप

Akash Dhake | Bhusawal News | Khabar 24 Express


भुसावळ येथे सुरू असलेल्या भुसावळ नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान पत्रकार आणि निवडणूक प्रशासनामध्ये तीव्र वाद निर्माण झाला आहे.

आज सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली असली, तरी तब्बल एक तास उलटूनही मीडिया कक्षात कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. यामुळे घटनास्थळी उपस्थित असलेल्या माध्यम प्रतिनिधींमध्ये प्रचंड असंतोष पसरला.

विशेष म्हणजे, मीडिया कक्ष उपलब्ध असतानाही माहिती देण्यासाठी कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नव्हती.

त्यामुळे पत्रकारांना अंदाजांवर बातम्या द्याव्या लागण्याची वेळ आली. याशिवाय, मतमोजणीस्थळी किमान एका माध्यम प्रतिनिधीस आत प्रवेश नाकारण्यात आल्याची गंभीर घटना घडली. या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.

या सर्व प्रकारांचा निषेध म्हणून भुसावळ शहरातील सर्व प्रकारच्या माध्यम प्रतिनिधींनी एकत्र येत निवडणूक मीडिया कक्षावर बहिष्कार टाकला.

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या भूमिकेविरोधात पत्रकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हा प्रकार माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणारा असल्याचे मत यावेळी मांडण्यात आले.

पत्रकारांनी सांगितले की, गेल्या ३० वर्षांच्या निवडणूक इतिहासात प्रथमच अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक माध्यम प्रतिनिधींना दिली जात आहे.

या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन योग्य कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी पत्रकारांकडून करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी तसेच जिल्हा प्रशासनाकडे आपल्या भावना आणि तक्रारी अधिकृतरीत्या मांडण्यात आल्या आहेत.

माध्यम स्वातंत्र्य अबाधित ठेवणे आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे.

मात्र, भुसावळमधील या घटनेमुळे निवडणूक व्यवस्थापनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन पुढे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

मुझे छोटी बहन समझकर माफ कर दें… लद्दाख में जवानों से भिड़ने वाली 25 साल की Gen Z पर्यटक ने मांगी माफी

मुझे छोटी बहन समझकर माफ कर दें... लद्दाख में जवानों से भिड़ने वाली 25 साल की Gen Z पर्यटक ने मांगी माफी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading