ब्यूरो रिपोर्ट | आकाश ढाके | भुसावळ न्यूज | खबर 24 एक्सप्रेस

भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाला मोठा राजकीय धक्का बसला असून, सत्ताधारी मंत्री संजय सावकारे यांना जनतेने स्पष्ट संदेश दिला आहे.
निवडणूक निकालानुसार गायत्री भंगाळे यांना ४२,२३४ मते मिळाली, तर रजनी सावकारे यांना ४०,३८७ मते मिळाली. सत्तेचा प्रभाव, प्रशासकीय यंत्रणा आणि संपूर्ण ताकद वापरूनही भाजपाला भुसावळमधील सत्ता कायम राखता आली नाही. या निकालामुळे स्थानिक पातळीवर भाजपच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या निवडणुकीत मतदारांनी विकासकामे, स्थानिक प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत सत्ताधाऱ्यांना नाकारल्याचे चित्र दिसून आले. “सत्ता असूनही जनतेचा विश्वास मिळाला नाही” असा स्पष्ट कौल मतपेटीतून दिला गेल्याची चर्चा शहरात होत आहे.
निकाल जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांनी शहरात आनंदोत्सव साजरा केला, तर भाजप गोटात शांतता आणि निराशेचे वातावरण पाहायला मिळाले. भुसावळच्या जनतेने या निवडणुकीतून “सत्ता नव्हे, काम महत्त्वाचे” असा ठाम संदेश दिला आहे.
ब्यूरो रिपोर्ट : आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7