Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / खमताणे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि आमदार जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा भुसावळ नाभिक संघाचा तीव्र निषेध

खमताणे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि आमदार जयंत पाटील यांच्या वक्तव्याचा भुसावळ नाभिक संघाचा तीव्र निषेध

भुसावळ | प्रतिनिधी | आकाश ढाके

नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील खमताणे येथे ९ वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी नाभिक समाजाच्या पारंपरिक व्यवसायाबाबत केलेल्या कथित अपमानजनक वक्तव्याचा भुसावळ शहर नाभिक संघाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला आहे.

या संदर्भात भुसावळ नाभिक संघाच्या शिष्टमंडळाने आज उपविभागीय प्रांताधिकारी, भुसावळ यांना निवेदन सादर केले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खमताणे (ता. सटाणा, जि. नाशिक) येथे नाभिक समाजातील ९ वर्षीय बालिकेवर ७० ते ७५ वर्षीय वृद्धाने अमानुष लैंगिक अत्याचार केल्याची घटना अत्यंत संतापजनक व मानवतेला काळीमा फासणारी आहे.

संबंधित आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी संघटनेने केली आहे. या प्रकरणात संशयित आरोपी नामदेव हरी गुंजाळ याला पोलिसांनी अटक केली असून, पैसे व चॉकलेटचे आमिष दाखवून गेल्या सहा महिन्यांपासून अत्याचार केल्याचा आरोप आहे.

निवेदनातील दुसऱ्या मुद्द्यात आमदार जयंत पाटील यांनी दिनांक १३ डिसेंबर २०२५ रोजी केलेल्या वक्तव्याचा उल्लेख करण्यात आला आहे. नाभिक समाजाला संत शिरोमणी संत सेना महाराजांचा महान वारसा लाभलेला असून, त्यांनी नाभिक व्यवसायाच्या रूपकातून समाजप्रबोधन आणि आत्मशुद्धीचा संदेश दिला आहे.

विवेक, वैराग्य व शांती यांचे महत्त्व सांगणाऱ्या या परंपरेचा अवमान होईल, अशा शब्दांत आमदार जयंत पाटील यांनी पोलीस प्रशासनाच्या संदर्भात नाभिक समाजाच्या व्यवसायाचा उल्लेख केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतरही त्यांनी शब्द मागे न घेता माफी मागण्यास नकार दिल्याने नाभिक समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. हे वक्तव्य समाजाप्रती तिरस्कार, हिनता व द्वेषभावना दर्शवणारे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

भुसावळ शहर नाभिक संघ तसेच सकल नाभिक समाजाच्या वतीने या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात येत असून, आमदार जयंत पाटील यांनी तात्काळ समाजाची जाहीर माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर सचिन सोनवणे, समय बोरसे, अनिल गे, विनोद आंबेकर, प्रशांत बाणाईत, पंडित समासे, माला दिल, रविंद्र अकर, पुरुषोत्तम रामदास हेमकर, विलास सुरेश जगताप आदींच्या सह्या आहेत.

भुसावळ | प्रतिनिधी | आकाश ढाके


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

Jalgaon News: स्कूल गई 9 साल की बच्ची रहस्यमय ढंग से लापता, गांव के बाहर मिला बैग, 3 दिन बाद भी कोई सुराग नहीं

Jalgaon News: स्कूल गई 9 साल की बच्ची रहस्यमय ढंग से लापता, गांव के बाहर मिला बैग, 3 दिन बाद भी कोई सुराग नहीं

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading