Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / मध्य रेल्वे RPF ची मोठी कारवाई: ऑक्टोबरमध्ये 8,184 आरोपी अटक, 38.03 लाखांचा दंड वसूल

मध्य रेल्वे RPF ची मोठी कारवाई: ऑक्टोबरमध्ये 8,184 आरोपी अटक, 38.03 लाखांचा दंड वसूल

आकाश ढाके रिपोर्ट, भुसावळ: मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) ऑक्टोबर 2025 महिन्यात व्यापक कारवाई करत रेल्वे अधिनियमांतर्गत मोठा धडक मोहीम राबवला. या मोहिमेत 8,184 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 38.03 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
रेल्वे परिसर अवांछित घटकांपासून मुक्त ठेवण्यासाठी RPF सतत गुप्त माहितीच्या आधारे तपास, छापेमारी आणि प्रतिबंधात्मक कारवाया करत आहे.


अभियानातील प्रमुख कारवाया

  • धारा 162 – महिला आरक्षित कोचमध्ये अवैध प्रवेश
  • 243 व्यक्तींवर कारवाई, ₹62,200 दंड वसूल.
  • रेल्वे मालमत्ता (अवैध कब्जा/चोरी) अधिनियम
  • 59 आरोपी पकडले, चोरलेली मालमत्ता जप्त, ₹4.62 लाख दंड वसूल.
  • दारू, गांजा व तंबाखू पदार्थांचा अवैध साठा
  • 17 व्यक्तींविरुद्ध कारवाई, जप्त मालाची किंमत ₹8.21 लाख.
  • प्रवाशांच्या सामानचोरी व इतर गुन्हे, 161 आरोपी अटक.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मजबूत उपाय

मध्य रेल्वे RPF ने प्रवासी—विशेषतः महिला प्रवाशांच्या—सुरक्षेला प्राधान्य देत खालील उपाय अधिक बळकट केले आहेत:

महत्वाचे सुरक्षा उपाय

  • स्टेशन परिसर व गाड्यांमध्ये 24×7 CCTV मॉनिटरींग
  • वंदे भारत, राजधानी, मेल/एक्सप्रेस व उपनगरीय गाड्यांमध्ये कठोर सुरक्षा तैनाती
  • उपनगरीय गाड्यांच्या पहिल्या व शेवटच्या डब्यात झपटमारांवर नियंत्रणासाठी RPF तैनात
  • महिला डब्यात रात्री महिला सुरक्षा कर्मचारी
  • CSMT, LTT, नाशिक रोड, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, दौंड, जळगाव, बडनेरा आणि नागपूर येथे “मेरी सहेली” टीम सक्रिय
  • मुंबई विभागात 54 ‘स्मार्ट सहेली’ व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप; 23,338 महिला सहभागी
  • EMU रेकमधील सर्व 788 महिला डब्यांमध्ये CCTV कॅमेरे
  • सर्व महिला डब्यांमध्ये Emergency Talk Back (ETB) सिस्टम


RPF ची बांधिलकी

मध्य रेल्वे RPF आपल्या कार्यक्षेत्रातील प्रवासी, रेल्वे मालमत्ता आणि साधनसंपत्तीचे संरक्षण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे. व्यावसायिक, प्रशिक्षित आणि समर्पित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून RPF सतर्कता, निष्ठा आणि जनसेवेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करत राहील.


ब्युरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ



Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading