Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ लूट प्रकरणाचा तपास ४८ तासांत पूर्ण – ड्रायव्हरच ठरला सूत्रधार, सहा आरोपी अटकेत

भुसावळ लूट प्रकरणाचा तपास ४८ तासांत पूर्ण – ड्रायव्हरच ठरला सूत्रधार, सहा आरोपी अटकेत

भुसावळ प्रतिनिधी आकाश ढाके : भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीत झालेल्या तब्बल २५.४२ लाख रुपयांच्या लुटीचा गुन्हा (गु. क्र. २०७/२०२५) अवघ्या ४८ तासांत उकलण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. तपासात फिर्यादीच्या कंपनीत काम करणारा ड्रायव्हर शाहीद बेग हा लुटीचा मुख्य सूत्रधार असल्याचे समोर आले आहे.

पोलीसांनी या प्रकरणात सहा आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून २३.४२ लाख रुपये रोख रक्कम आणि तीन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

घटनेचा आढावा

२८ ऑक्टोबरच्या रात्री फिर्यादी मोहम्मद यासीन इस्माईल हे कंपनीचे पैसे — एकूण २५.४२ लाख रुपये — बॅगेत घेऊन मोटारसायकलवरून घरी जात असताना, खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला करून पैशांची बॅग हिसकावून नेली. या घटनेनंतर भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला.

तपास आणि उकल

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चौकशीत फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय आल्याने त्याच्याकडे चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यानेच या लुटीचा कट रचल्याची कबुली दिली.

शाहीद बेगनेच पैशांच्या ने-आण वेळेची माहिती देऊन आपल्या साथीदारांना “टिप” दिली होती. त्याच्या मदतीनेच या गुन्ह्याची आखणी करण्यात आली होती.

या गुन्ह्यात सहभागी आरोपींची नावे अशी आहेत —

  1. शाहीद बेग इब्राहिम बेग (२५, भुसावळ) – मुख्य सूत्रधार, ड्रायव्हर
  2. मुजाहिद आसीफ मलीक (२०, भुसावळ) – कट रचणारा
  3. मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (१९, भुसावळ) – कट रचणारा
  4. अजहर फरीद मलक (२४, रसलपूर) – प्रत्यक्ष लुटीमध्ये सहभागी
  5. अमीर खान युनुस खान (२४, रसलपूर) – प्रत्यक्ष लुटीमध्ये सहभागी
  6. ईजहार बेग इरफान बेग (२३, रसलपूर) – प्रत्यक्ष लुटीमध्ये सहभागी

गुन्हेगारी पार्श्वभूमी

मुख्य आरोपी शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी आणि मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे नोंद आहेत. तर अमीर खानवर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.

पुढील तपास

आरोपींकडून जप्त केलेल्या रकमेशिवाय उर्वरित दोन लाख रुपये शोधण्याचे काम सुरू आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून तपासाची धुरा पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या हाती आहे.

तपास पथकाचे मार्गदर्शन

उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली

  • पो.नि. राहुल गायकवाड (स्था.गु.शा. जळगाव)
  • पो.नि. राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ)
  • पो.नि. महेश गायकवाड (भुसावळ तालुका)
    या अधिकाऱ्यांच्या पथकाने अतिशय काटेकोर आणि जलद कारवाई करत लूट प्रकरण उघडकीस आणले.

ब्युरो रिपोर्ट : आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

बेहोशी की हालत में गोविंदा को आधी रात अस्पताल में कराया गया एडमिट, एक दिन पहले धर्मेंद्र से मिलने पहुंचे थे एक्टर

बेहोशी की हालत में गोविंदा को आधी रात अस्पताल में कराया गया एडमिट, एक दिन पहले धर्मेंद्र से मिलने पहुंचे थे एक्टर

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading

Subscribe