Is this correct?
चंद्रशेखर बावनकुळे हे एक असे मंत्री आहेत जे रात्रंदिवस जनतेच्या सेवेसाठी झटत राहतात!

खबर 24 एक्सप्रेस | आकाश ढाके, विशेष रिपोर्ट : महाराष्ट्राच्या राजकारणात असे काही मोजकेच नेते आहेत जे केवळ खुर्चीवर न बसता थेट जमिनीवर उतरून काम करतात. चंद्रशेखर बावनकुळे हे असेच एक नाव आहे. ते कधी थकतात की थांबतात, हेच मुळी त्यांच्या दिनक्रमातून समजत नाही. त्यांचा दिवस पहाटे सुरू होतो आणि रात्री उशिरापर्यंत – जवळपास रात्री १० वाजेपर्यंत – लोकांच्या सेवा आणि संवादात व्यस्त राहतो.
बावनकुळे हे केवळ योजनांचे मंत्री नाहीत, तर त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवणारे आणि त्यांच्या अंमलबजावणीची खात्री करणारे खरे लोकप्रतिनिधी आहेत. गावोगावी जाऊन नागरिकांच्या अडचणी समजून घेणे आणि संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ उपाययोजना करण्याचे आदेश देणे, ही त्यांच्या कामाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.
कोराडीतील जनसंपर्क कार्यालयात थेट संवाद
नागपूर जिल्ह्यातील कोराडी येथील आपल्या जनसंपर्क कार्यालयात त्यांनी नुकताच नागरिकांशी थेट संवाद साधला. अनेक नागरिक आपल्या समस्या, सूचना व मागण्या घेऊन आले होते. पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण आदी प्रश्न मांडण्यात आले.
बावनकुळे यांनी प्रत्येक नागरिकाचं म्हणणं काळजीपूर्वक ऐकलं, समजून घेतलं आणि त्यावर त्वरीत उपाययोजनेसाठी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. “जनतेच्या अडचणींचं निराकरण वेळेत व्हायलाच हवं, ही माझी जबाबदारी आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

झपाटलेपणाची प्रतिमा
चंद्रशेखर बावनकुळे हे केवळ मंत्री म्हणून काम करत नाहीत, तर एका जबाबदार कार्यकर्त्याप्रमाणे कार्य करतात. जनतेशी त्यांचा संवाद केवळ औपचारिक नसतो, तर तो आपुलकी आणि आत्मीयतेवर आधारलेला असतो. म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्रात बावनकुळे यांच्या प्रति लोकांमध्ये विश्वास आणि श्रद्धेची भावना निर्माण झाली आहे.
जेव्हा अनेक नेते केवळ सोशल मीडियावरच सक्रीय असतात, तेव्हा बावनकुळे खऱ्या अर्थाने गावोगाव फिरत असतात, लोकांशी संवाद साधत असतात, त्यांचे प्रश्न समजून घेत असतात. हाच त्यांच्या कार्यपद्धतीचा पाया आहे.
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7
One comment
Pingback: Name the sports complex after Sardar Patel, Bhusaval News