Breaking News
BigRoz Big Roz
Home / Maharashtra / भुसावळ तालुक्यात सरपंच पदासाठी महिला आरक्षण निश्चित

भुसावळ तालुक्यात सरपंच पदासाठी महिला आरक्षण निश्चित

भुसावळ तालुक्यातील एकूण ३९ ग्रामपंचायतींमध्ये सन २०२५ ते २०३० या पंचवार्षिक कालावधीसाठी सरपंच पदासाठी ५० टक्के जागा महिलांसाठी आरक्षित करण्याची प्रक्रिया आज पार पडली. भुसावळ येथील तापी सभागृहात उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तहसिलदार श्रीमती निता लबडे यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत (सरपंच, उपसरपंच) निवडणूक नियम १९६४ अन्वये ही आरक्षण प्रक्रिया राबवण्यात आली. यामध्ये मागील पंचवार्षिकात आरक्षीत झालेल्या ग्रामपंचायती वगळून चिठ्ठीद्वारे निवड करण्यात आली. सभेसाठी ग्रामपंचायतींचे आजी-माजी सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, नागरिक व राजकीय पक्षांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षणाचा तपशील :

तालुक्यातील एकूण 39 पैकी 21 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या असून त्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण या प्रवर्गांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती (४ ग्रामपंचायती) :

पिंपळगाव खुर्द, खंडाळे, चोरवड-खेडी बु, खडके.

अनुसूचित जमाती (४ ग्रामपंचायती) :

फेकरी, फुलगाव, साकरी, दर्यापूर.

नागरिकांचा मागास प्रवर्ग (६ ग्रामपंचायती) :

वराडसिम, शिंदी, वेल्हाळे, ओझरखेडा, पिंपळगाव बु., सुनसगाव.

सर्वसाधारण (७ ग्रामपंचायती) :

अंजनसोंडे, कन्हाळे खुर्द, बेलव्हाय, कठोरे बु., कठोरे खु., बोहर्डी बु.-बोहर्डी खुर्द, साकेगाव.

उपरोक्त वर नमुद ग्रामपंचायती पैकी पिंपळगाव खुर्द, खंडाळे, चोरवड-खेडी बु, खडके, दर्यापूर, सुनसगाव व साकेगांव या ग्रामपंचायती करिता आरक्षण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने चिठ्ठीद्वारे तोषल मोहन राऊत वय 6 वर्षे या बालकाच्या हस्ते काढुन पार पडली. यामुळे ग्रामपंचायतींच्या कारभारात महिलांचा सहभाग अधिकाधीक वाढेल असे मत अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसिलदार निता लबडे, नायब तहसिलदार श्रीमती शोभा घुले, पुजा अवघडे, कर्मचारी श्रीमती सुनिता खडके, खातीब तडवी, शरीफ तडवी, जितेश चौधरी यांनी कामकाज केले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

.

.

.


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading