
महाऑनलाईनचं पोर्टल चालत नसल्याने विद्यार्थ्यांना विविध दाखले मिळणे कठीण झाले आहे. महाऑनलाईन च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वाचे असे शैक्षणिक दाखले जसे की उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, डोमेसाईल, नॅशनॅलिटी आणि इतर प्रमाणपत्र मिळणे कठीण झाले आहेत. त्यामुळे पालक आणि विद्यार्थी त्रस्त झाले आहेत.
आता हे पोर्टल सुरळीत होणार कधी याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण कुठे आहोत हा विचार करण्याची वेळ सरकारवर आलेली आहे. कारण मागच्या अनेक दिवसांपासून राज्यभरातील आपले सरकार केंद्र टप्प झालेले आहेत. कारण महाऑनलाईन पोर्टल आहे ते पोर्टल दोन दिवसांपासून चालत नाही आहे.
आज त्याचा तिसरा दिवस आणि याचा परिणाम जो आहे तो सुरू झालेल्या शैक्षणिक क्षेत्रामधील पालक आणि विद्यार्थ्यांना बसतोय कारण आपले सरकार केंद्रांच्या माध्यमातून राज्यभरामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर महत्वाचे प्रमाणपत्र जे ऍडमिशन साठी लागतात ते प्रमाणपत्र मिळणं कठीण झाले आहेत. पालक असतील विद्यार्थी असतील ते या आपले सरकार केंद्रांवर चक्कर मारून मारून बेजार झालेले आहेत. या ठिकाणी आल्यानंतर त्यांना एकच सांगण्यात येते की पोर्टल हे बंद आहे / चालत नाही आहे. महा-ई-सेवा केंद्र चालकांना विचारणा केली तर त्यांचही तेच म्हणणं आहे कि, मागच्या दोन – तीन दिवसांपासून हे पोर्टल चालत नाही आहे. त्यामुळे कागदपत्रे अपलोडिंग असेल किंवा इतर जे काही प्रक्रिया असतील ती करता येत नाही आहे.
केवळ हा याच वर्षाचा प्रश्न नाही आहे. मागच्या अनेक वर्षांपासून समस्या होत आहे. जेव्हा पण शैक्षणिक सत्र सुरू होते त्याचं वेळेला हे महाऑनलाईनचं पोर्टल बंद पडत असते आणि याचा फटका जो आहे तो पालकांना व विद्यार्थ्यांना बसतो,
कारण अनेक विद्यार्थ्यांचं जर बघितलं तर ऍडमिशन साठी हे शैक्षणिक प्रमाणपत्र वेळेत न मिळाल्यामुळे त्रास होतो. त्यामुळे शासनाने महाऑनलाईनची जी काही पोर्टल आहे त्यांचा लोड लक्षात घेऊन त्यानुसार सर्वर ची संख्या वाढवून पोर्टल सुलभ करणं गरजेचं आहे. कारण 5जी तंत्रज्ञान आपल्याकडे सुरू झालेले आहे आणि असं असताना जर शासनाचे पोर्टल चालत नसतील तर विद्यार्थी आणि पालकांनी दाद मागायची कुणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ब्युरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
.
.
.
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7