Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबीराला ना. संजय सावकारे यांची उपस्थिती

छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबीराला ना. संजय सावकारे यांची उपस्थिती

महसुल प्रशासनाच्या वतीने भुसावळ महसुल मंडळात आदित्य लॉन्स भुसावळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबीराचा ना. संजय सावकारे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आला. तहसिलदार भुसावळ यांनी सदर शिबीरा बाबत माहिती तसेच सामान्य नागरीक, विदयार्थी, महिला व अपंग यांना विविध प्रकाराच्या सेवा उत्पन्न दाखले, वय व अधिवास प्रमाणपत्र, जातीचे दाखले, नॉन-क्रिमीलेअर, रहिवास दाखले, जिवंत 7/12, संजय गांधी योजना, ई-शिधापत्रिका, धान्य योजनेचा मंजुरी लाभ, प्रधानमंत्री आवास योजना, मंजुरी बाबत पत्र आदेश मान्यवांराच्या हस्ते वाटप करण्यात आले.

तहसिल कार्यालयात पुरवठा विभागात आर.सी. नंबर व धान्य कोटा मंजुरी बाबत नागरीकांच्या तक्रारी बाबत शासनाकडुन ई-रेशनकार्ड व आर.सी. नंबर करीता पब्लिक लॉगीन देण्यात आले आहे. पुरेशी माहिती नसल्याने किंवा अज्ञान मुळे पाहिजे तसा प्रतिसाद नसल्यामुळे तहसिल कार्यालयात सदर विषयी गर्दी व तक्रारी येत असता सदर पब्लिक लॉगीन सोबत महाऑनलाईन पोर्टलवर जर ही सेवा देण्यात आली तर बरेचश्या तक्रारी कमी होतील तसेच भुसावळ तालुक्यास चालु वर्षात 1700 युनीटचा वाढीव धान्य कोटा हा अपंग, विधवा व गरजु यांना बसविण्यात आलेला असुन 4500 अर्ज तहसिल कार्यालयाकडेस प्रंलबित असले बाबत माहिती देण्यात आली सदर पंचायत समिती व नगर परिषद यांचे टिम कडुन सामाजिक आंकेक्षण करुन श्रीमंत लाभार्थी वगळुन प्रस्ताव आले तर सदरचे अर्ज मंजुर करता येतील याबाबत देखील माहिती देण्यात आली तसेच शिबीरामध्ये 1.कृषी विभाग 2. नगरपालिका 3. पंचायत समिती 4. वर विभाग 5. महिला बालविकास विभाग 6. सां. बांधकाम विभाग 7. पशुसंवर्धन विभाग 8. सहाय्यक निबंधक 9. विज वितरण कंपनी 10. आरोग्य विभाग 11. भुमी अभिलेख विभाग 12. लघु पाटबंधारे विभाग 13. आधार केंद्र 14. ॲग्रीस्टॅक नोंदणी 15. आपले सरकार सेवा केंद्र तसेच इतर शासकीय विभागांचे स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले होते. त्यात विविध विभागाच्या योजनेची माहिती देऊन काही लाभार्थी यांचे योजनेचे ऑन-लाईन फार्म देखील भरण्यात आले तसेच समस्या, अडचणी व तक्रारी नागरीकांच्या घेऊन तत्पर सोडविणे बाबत कार्यवाही करण्यात आली सर्व शासकीय विभागाच्या स्टॉलला ना. संजय सावकारे यांनी भेट देऊन माहिती घेतली सदर कार्यक्रमास तहसिलदार निता लबडे, मुख्याधिकारी राजेंद्र फातले, गट विकास अधिकारी सचिन पानझाडे व सर्व कार्यालयाचे प्रमुख व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

चमोली में निर्माणाधीन टनल में कुदरत का कहर! पानी और मलबे में फंसे मजदूर, NDRF का रेस्क्यू ऑपरेशन जारी

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading