Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / महिला भगिनींना दिला जाणारा पुरस्कार तिला स्वावलंबी बनवतो – डॉ. छाया चौधरी

महिला भगिनींना दिला जाणारा पुरस्कार तिला स्वावलंबी बनवतो – डॉ. छाया चौधरी

महिला भगिनींना दिला जाणारा पुरस्कार हा तिला स्वावलंबी बनवतो, तिला प्रेरणा देतो, स्फूर्ती देतो, समाजाचं आम्ही काहीतरी देणं घेणं लागतो याची जाणीव त्यांच्या मनामध्ये निर्माण होते तसेच या पुरस्कारामुळे तिची जबाबदारी वाढते असे प्रतिपादन भुसावळ येथील डॉ. छाया चौधरी यांनी केले.
भुसावळ येथील इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी च्या वतीने “उंच माझा झोका” पुरस्कार सोहळ्याचं महिला दिनाचे औचित्य साधून आयोजन करण्यात आलेले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी डॉ. छाया चौधरी, ईनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी च्या अध्यक्षा मिनाक्षी धांडे, सेक्रेटरी किरण जावळे आदी मान्यवर उपस्थित होते. इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटी च्या वतीने दरवर्षी अत्यंत कठोर परिश्रमातून ज्या महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या अशा कर्तृत्व वान महिलांचा “उंच माझा झोका” हा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार मंगला भीमराव पाटील, कोमल संदीप महाजन, मालतीबाई रमेश कुरकुरे, नीलिमा बोंडे, डॉ. वैशाली रुपेश निकुंभ या महिला भगिनींना दिला गेला.
या कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन रेवती सोनू मांडे या होत्या. या प्रसंगी मृणाल पाटील यांनी त्यांच्या वतीने लक्ष्मी सांगळे या महिला भगिनीला शिवण मशीन भेट म्हणून दिले. या शिवण मशीनच्या माध्यमातून लक्ष्मी चांगळे या स्वतःच्या पायावर उभे राहतील असा विश्वास मृणाल पाटील यांनी व्यक्त केला. लक्ष्मी चांगळे यांनी या प्रसंगी असे सांगितले की, या मला मिळालेल्या शिलाई मशीन मुळे मी स्वतःच्या पायावर उभी राहील, स्वावलंबी होईल. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला भगिनींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व पुरस्कार्थी महिला भगिनींचा परिचय विनिता सुनील नेवे यांनी केला तर आभार प्रदर्शन सेक्रेटरी किरण जावळे यांनी केले.

ये भी देखें

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

वाराणसी में हिंदू लड़की ने 6 मुस्लिम युवकों का सिर काटकर काली माता को चढ़ाया? सोशल मीडिया पर वायरल दावे का जानिए पूरा सच

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading