
निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक मध्ये 103 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी संघर्ष संघटनेच्या बेमुदत धरणे आंदोलन व उपोषणाला जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी भारत किसान राष्ट्र समितीचे प्रदेशाध्यक्ष श्री. माणिकदादा कदम विभागीय अध्यक्ष श्री.नानासाहेब बच्छाव व सोबत शेतकरी नेते श्री.सुधाकर मोगल आणि श्री.भगवान बोराडे उपस्थित होते.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची सक्तीची वसुली तत्काळ थांबवावी व राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जाची हमी घेऊन शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, यासह प्रमुख मागण्यांसाठी सुरू असलेल्या धरणे आंदोलन व उपोषणाच्या 103व्या दिवशी निलेश राणे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्री. निलेश मधुकर राणे यांनी उपोषणकर्त्यांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.याप्रसंगी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत, मी तुमच्याबरोबर असल्याची ग्वाही त्यांनी आंदोलनकर्त्यांना दिली.

शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांनी धरणे धरत अन्नत्याग आंदोलनास पाठिंबा दिला. शेतकरी संघटना, शेतकरी समन्वय समिती व आदिवासी संघर्ष समिती यांच्यातर्फे १ जूनपासून हे उपोषण आंदोलन सुरू केले आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, नाशिक