सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद येथील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. सुनील नेवे हे नुकतेच अर्जेंटिना या देशाची राजधानी ब्युनोस एअर येथे internaitional पॉलिटिकल सायन्स असोसिएशन च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यशास्त्र विषयाच्या 27 व्या वर्ल्ड काँग्रेस या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी भुसावळ येथून रवाना झालेले आहेत.
दि. 15 जुलै ते 19 जुलै 2023 दरम्यान युनिव्हर्सिटी ऑफ कॅटोलिका अर्जेंटिना येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रा. डॉ. सुनील नेवे हे ” रशिया आणि युक्रेनच्या युद्धाचा भारताच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक पैलूंवर झालेल्या परिणामांचा अभ्यास “या विषयावर शोधनिबंध सादर करणार आहेत. त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अनिल दादा चौधरी, चेअरमन लीलाधर चौधरी, सेक्रेटरी नितीन चौधरी, अमोल हरिभाऊ जावळे, दिलीप चौधरी, हेमलता इंगळे, मोहन दादा चौधरी, नारायण चौधरी, नितीन चौधरी, लीलाधर अप्पा चौधरी, किशोर महाजन, गणेश नेहेते, अरुण दादा चौधरी, भास्कर पिंपळे, मधुकर परतणे, इच्छाराम चौधरी तसेच सर्व पदाधिकारी, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर कोल्हे उप-प्राचार्य प्रा. मुकेश चौधरी, प्रा.जतिन मेढे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ