ताप्ती पब्लिक सीबीएसई इग्लीश मिडियम स्कूल मध्ये वृक्षारोपण दिन साजरा करण्यात आला. वृक्षा रोपन दिना निमित्ताने शाळेच्या परिसरात रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर व जळगाव जिल्हा संघटन गाईड हेमा वानखेडे यांनी वृक्षारोपण केले. पर्यावरण जनजाृतीसाठी शालेय परिसरात विद्यार्थांची भव्य अशी रॅली काढण्यात आली. झाडे लावा, झाडे जगवा, सेव वॉटर सेव ट्री अशा घोषणा देण्यात आल्या.
शाळेच्या परिसरात वड,आंबा, सिसम,लिंब अशा विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.
शाळेच्या प्रिंसीपल नीना कटलर यांनी विद्यार्थांना पर्यावरण बद्दल माहिती सांगितली व आपल्या घराजवळ झाडे लावण्यास सांगितले.
या कार्यक्रमास स्काऊट मास्टर निलेश फंड, गाईड कॅप्टन अनिता कोळी, विजय संकत, नितीन अडकमोल, सोनाली मुजुमदार, श्रद्धाली घुळे, मनप्रीत कौर व अन्य शिक्षक उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार सोनाली मुजुमदार यांनी मानले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ