
दि. १ ऑगस्ट (महसुल दिन) या दिवशी मा. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार श्री. अंगद आसटकर, महसूल सहाय्यक श्री. अमोल विकास पाटील यांचा उत्कृष्ट काम करणारे अधिकारी / कर्मचारी म्हणुन तसेच भुसावळ शहर तलाठी श्री. पवन विजय नवगाळे यांचा उत्कृष्ट तलाठी म्हणुन जिल्हाधिकारी सो. अभिजीत राऊत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे संपन्न झाला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, निवासी उप-जिल्हाधिकारी राहुल पाटील, एसपी डाॅ. प्रविण मुंढे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ