खांदेशातील क्राईम केपिटल बनू पाहणाऱ्या भुसावळमध्ये वाढत्या गुन्हेगारीतून टोळी युद्धाने बस्तान बसवले आहे. किरकोळ घटनामध्ये देखील गावठी पिस्तूल, चाकू हल्ले केव्हाही कुठेही सर्रास पणे सूरू आहे. या हत्यारांचा खेळण्या सारखा वापर होतोय. असे नित्याचेच प्रकार सुरु झाले आहेत. दिवसा ढवळ्या चैन स्केचिंग, चोऱ्या दरोडे च्या घटना वाढत आहेत.यात मोठया प्रमाणात बाल गुन्हेगार, युवक, पर राज्यातून येणारे यांचा यात ,मोठया प्रमाणात सहभाग दिसत आहे. या सर्व गुन्हेगाराना वठणीवर आणण्यासाठी भुसावळ शहरातील पोलीस संख्या बळ अतिशय अल्प ठरतं, त्यामुळे येथील पोलीस यंत्रणावर याचा फार मोठा ताण निर्माण झालाय. एखादा गुन्हा घडल्यावर भुसावळ कर पोलीस यंत्रणे ची अचानक धावपळ होते..दररोज ची पेट्रोलिंग करणे, प्रलंबित गुन्ह्यांचा तपास लावणे वगैरे साठी त्यांचेकडे अतिरिक्त ताण व भार असल्यामुळे ते सतत व्यस्त असतात. अशातच दीड लाखाच्या वर लोकसंख्या असलेल्या भुसावळ शहराच्या गुन्हेगारीवर नियंत्रण आणण्या ठी याची मदार जवळपास फक्त 300 ते 400 पोलीसावर आहे.. त्यामुळे शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविणे कठीण जाते त्यामुळे त्यांची प्रचंड द मछाक होत आहे. म्हणून भुसावळ शहरातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी व गुन्हेगारी मुक्त भुसावळ शहर निर्मिती साठी तसेच भुसावळ कराना भयमुक्त करण्यासाठी त्वरित पोलीस कर्मचारी संख्या वाढवावी तसेच शहरातील विविध संवेदनशील प्रभागात नवीन पोलीस चौक्याची निर्मिती करण्याची सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटिल, पोलीस महासंचालक महाराष्ट्र , विशेष पोलीस महारानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र यांचेकडे केली असल्याचे त्यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे रिपोर्टर – आकाश ढाके