भुसावळ – पोलीस महानिरीक्षक (IG) मा.श्री.प्रतापराव दिघावकर साहेब यांच्या हस्ते क्रीडा क्षेत्राचे राष्ट्रीय युवा प्रेरणास्त्रोत व राज्याचे युवा समाजसेवक म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणारे निलेश राणे यांना २०२१ चा आंतरराष्ट्रीय स्तरावरील “इंटरनॅशनल आयकॉन” हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
For More news, please click here : Breaking | मध्यप्रदेश के सीएम शिवराज ने कहा कि, अभी नहीं लगवाऊंगा कोरोना वैक्सीन | Khabar24 Express
निलेश राणे यांनी ९ वर्षांपासून राज्यातील ग्रामीण भागात क्रीडा क्षेत्राचा मोठा प्रमाणावर विकास व्हावा त्यासाठी ते प्रयत्न करत आहे, आणि मोठ्या प्रमाणात ग्रामीण खेळाडूंना अचूक मार्गदर्शन करून त्यांना राज्य व राष्ट्रीय पातळीवर खेळण्यास संधी उपलब्ध करून देणे तसेच त्या खेळाडूंसाठी ग्रामीण भागातच काही क्रीडा स्पर्धेचे आयोजन करणे त्याच बरोबर सामाजिक क्षेत्रात अग्रेसर राहून आरोग्य, शिक्षण, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात गोरगरिबांना निस्वार्थी मदत करणे, अश्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले ही भुसावळसाठी व राज्यासाठी गौरवाची बाब आहे, तसेच निलेश राणे यांना आतापर्यंत अनेक राष्ट्रीय पुरस्कार भेटले आणि राष्ट्रीय बुक मध्ये सुद्धा त्यांची नोंद करण्यात आली आहे.
भुसावल प्रतिनिधि काश ढाके, Khabar 24 Express