Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट ; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती

रक्षा खडसे न्यूज | ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके| खबर 24 एक्सप्रेस


राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतासाठी पदके जिंकणाऱ्या खेळाडूंनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ७, लोककल्याण मार्ग, नवी दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी केंद्रीय युवा कार्य व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांचीही उपस्थिती होती.

ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील आपले अनुभव खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधताना शेअर केले. भारतीय खेळाडूंनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे पंतप्रधानांनी कौतुक करत सर्व पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.

भारतीय खेळाडूंच्या या यशामुळे देशातील लाखो युवकांना क्रीडा क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.

या भेटीमुळे खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, देशासाठी गौरव मिळवून देणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, नवी दिल्ली


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ’ पुरस्काराने ओमकार क्रीडा संघाचा गौरव; महाबली क्रीडा प्रसारक मंडळाच्या कार्याला मानाची पावती

सर्वोत्कृष्ट शिस्तबद्ध संघ' पुरस्काराने ओमकार क्रीडा संघाचा गौरव; महाबली क्रीडा प्रसारक मंडळाच्या कार्याला मानाची पावती

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading