Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल

एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध सावदा पोलिसात गुन्हा दाखल

Maharashtra Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express


राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार एकनाथ खडसे यांच्याविरुद्ध मंत्र्यांसह पोलिस अधिकाऱ्याला शिवीगाळ व दमदाटी करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बुधवारी सायंकाळी सावदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याबाबत सहायक पोलिस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी दुपारी सावदा पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावर खडसे यांनी त्यांना बोलावून घेतले.

तासखेडा (ता. रावेर) येथील गौण खनिज प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही, असा जाब विचारत त्यांनी मोठ्या आवाजात आरडाओरडा केला. तसेच “तुम्ही कोट्यवधी रुपये खाल्ले आहेत” असे म्हणत अपमानास्पद शब्दांचा वापर केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.


संबंधित अधिकाऱ्यांनी २९ जानेवारी २०२६ रोजी पाटबंधारे विभागाचे अधिकारी भातेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली.

Oमात्र, तपास सुरू असल्याने कागदपत्रे देण्यास नकार दिल्यानंतर खडसे अधिकच संतप्त झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. “आगामी अधिवेशनात बघून घेतो, अॅन्टी करप्शनचा ट्रॅप लावतो,” अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे.


यासोबतच संबंधित प्रकरणाच्या अनुषंगाने मंत्र्यांविरोधात अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.


या घटनेबाबत सहायक पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवली असून, आमदार खडसे यांच्याविरुद्ध दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, सावदा


Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- ‘बात बंद कर दी थी’, एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

UP Crime News: पीलीभीत में पैरामेडिकल छात्रा कशिश पटेल की हत्या, आरोपी बोला- 'बात बंद कर दी थी', एक दिन पहले खरीदा था 12 इंच का चाकू

Leave a Reply

Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading