
भुसावळ (प्रतिनिधी : आकाश ढाके) : कडगाव शिवारातील वाघूर नदीपात्रात सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर महसूल विभागाने सोमवारी मोठी कारवाई केली. तहसीलदार नीता लबडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अचानक धाड टाकून अवैध गौण खनिज तस्करांच्या मुसक्या आवळल्या.
या कारवाईदरम्यान ६ डंपर आणि १ जेसीबी वाहन मुरूम उत्खनन करताना रंगेहाथ जप्त करण्यात आले. महसूल आणि पोलिस पथकाची वाहनं पाहताच काही तस्करांनी घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महसूल कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्यांना पकडले.
प्राप्त माहितीनुसार, तहसीलदार नीता लबडे आणि त्यांचे सहकारी अधिकारी महिला मंडळाधिकारी रजनी तायडे, भुसावळ मंडळाधिकारी प्रफुल्ल कांबळे, प्रवीण पाटील, तलाठी नितीन केले, गोपाळ भगत, मंगेश पारिसे, रोषन कापसे, तेजस पाटील, जितेश चौधरी, संदीप पाटील आदींनी संयुक्तपणे ही कारवाई केली.
नशिराबाद पोलिस ठाण्याच्या बंदोबस्तात सर्व जप्त वाहने व साहित्य संध्याकाळपर्यंत भुसावळ तहसील कार्यालयात जमा करण्यात आले.
या कारवाईमुळे अवैध गौण खनिज तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूल विभागाच्या पुढील कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
ब्यूरो रिपोर्ट : आकाश ढाके, भुसावळ
.
.
.
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express
