समाज संघटन शक्ती हीच समाजाचा विकास करू शकते असे प्रतिपादन आमदार संजय सावकारे यांनी भुसावळ येथे केले ते भुसावळ येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात थोर सक्षम फाउंडेशन संचलित थोर लेवा पाटील व जय हिंद ग्रुप भुसावळ तर्फे आयोजित भव्य नामावली पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोलते फाउंडेशनचे अध्यक्ष निशिकांत कोलते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष युवराज लोणारी, माजी नगरसेवक पिंटू कोठारी, शिवसेनेचे दीपक धांडे, सामाजिक कार्यकर्ते सतिश सपकाळे, सर्वोदय मंडळ अध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उल्हास चौधरी, थोर पंचायत समिती अध्यक्ष दिनेश पाटील, परशुराम चौधरी, दिनकर पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व स्वागत गीता ने करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांचा तसेच पुस्तक नामावली मध्ये जाहिरात देणारे व पुस्तक तयार करण्यासाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. भुसावळ शहरातीत थोर लेवा समाज बांधवांची सविस्तर पारिवारिक माहिती चे पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले .
या प्रसंगी आमदार संजय सावकारे यांनी सांगितले की थोर लेवा समाज रूढी व परंपरा पाळून विकास करणारा आहे. जागा मिळाली तर समाजासाठी हॉल तयार करायचा असल्यास मी तो करून देईल तसेच समाजात संघटन शक्ती मोठी असून प्रकाशित झालेले नामावली या प्रकारचे पुस्तक मी पहिल्यांदाच बघत आहे. याप्रसंगी चंद्रकांत चौधरी यांनी गावा-गावातील पाणी प्रश्न, प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा विषय आपल्या मनोगतात मांडला. अध्यक्षीय भाषणात निशिकांत कोलते यांनी समाजाच्या विकासासाठी समाजातील प्रत्येकाने तन, मन, धन पद्धतीने मदत करण्याचे आवाहन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक परशुराम चौधरी यांनी मांडले. सुत्रसंचालन युवराज कुरकुरे सर व एम के पाटील सर यांनी केले तर आभार चेतन चौधरी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी थोर पंचायत समिती, जयहिंद गृप व थोर सक्षम फाउंडेशनचे मनोज कुरकुरे, चंद्रशेखर चौधरी, योगेश रोटे, संजय चौधरी, प्रशांत पाटील, किरण चौधरी, प्रकाश चौधरी, शरद पाटील, तुषार कुरकुरे , संदीप पाटील, मिलिंद पाटील, चंदन पाटील, प्रवीण महाजन, जितेंद्र चौधरी, अतुल पाटील, लालचंद चौधरी, सुभाष चौधरी, डिगंबर पाटील, हितेश पाटील, प्रमोद लोणे, विजय चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ