तिरोडा/साकोली,दि.23-तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विविध कामाच्या लोकार्पण व भूमिपूजनासाठी आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजय रहागंडाले यांच्या धानाला 500 रुपये प्रती क्विंटल बोनस देण्याच्या मागणीवर बोलतांना धानाला बोनस आणि मासेमारांना मदत तिरोडा येथे नाही तर मी सेंदुरवाफा येथील सभेत जाहीर करणार असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी केले.त्यानंतर साकोली तालुक्यातील सेंदुरवापा येथे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्याच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी बोलतांना धानाला प्रतीक्विंटल 500 रुपये बोनस देण्याची घोषणा केली.ते गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील साकोली व तिरोडा विधानसभा मतदारसंघातील विविध कामांच्या भूमिपुजन सोहळ्याकरीता आले असतांना आज(दि.23) बोलत होते.
यावेळी केंद्रीय जहाजबांधणी मंत्री ना. नितीन गडकरी,गोंदियाचे पालकमंत्री राजकुमार बडोले,भंडारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तिरोड्याचे आमदार विजय रहांगडाले,साकोली आमदार बाळा काशीवार,तुमसर आमदार चरण वाघमारे,भंडारा आमदार यांच्यासह माजी खासदार डाॅ.खुशाल बोपचे,भाजप जिल्हाध्यक्ष हेमंत पटले,प्रदिप पडोळे,माजी आमदार केशव मानकर,खोमेश रहागंडाले,भजनदास वैद्य,हरिष मोरे,नगराध्यक्ष आशिष बारेवार,अशोक इंगळे,उपाध्यक्ष सुनिल पालांदूरकर,सुरेश रहांगडाले,पंकज रहागंडाले,रविकांत बोपचे,डाॅ.लक्ष्मण भगत व इतर मान्यवर मंचावर सेंदुरवापा व तिरोडा येथील कार्याक्रमात उपस्थित होते. याप्रसंगी आयोजित एका सोहळ्यात धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-2 सह विविध रस्ते आणि बांधकामाचे भूमीपूज नसह लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस तिरोडा येथे जाहिर न करता सेंदुरवाफ्याच्या सभेत करणार अ