तिरोडा तालुक्यातील जि. प. उच्च माध्यमिक विद्यालय सुकडी येथील बारावीचे परीक्षा केंद्रविभागीय सचिव यांच्या आदेशान्वये रद्द झाल्यामुळे परिसरातील सुकडी येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्यामुळे शाळेत शिकणारे विद्यार्थी, पालक, व शाळा समिती यांनी आज दिनांक 2 फेब्रुवारी 2019 रोजी आमरण उपोषण पुकारले होते…..
या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन आमदार श्री विजयभाऊ रहांगडाले यांनी सदर विद्यार्थी, पालक यांच्यावर होणाऱ्या अन्यायविषयी मा. शिक्षणमंत्री ना. विनोद तावडे यांचेशी चर्चा करून माहिती दिली व उपोषण स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन सुकडी(डाँ.) ता.तिरोडा येथील परीक्षा केंद्र क्र.770 पूर्ववत सुरू करण्याचे आदेश प्राप्त करून दिल्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले…..
यावेळी मा. उपाध्यक्ष श्री मदनभाऊ पटले, कृ.ऊ.बा.स. संचालक श्री मिलिंद भाऊ कुंभरे, उपसरपंच श्री निलेश बावनथडे,बालु बावनथडे विद्यार्थी यांनी आमदार महोदयांचे आभार मानले