Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / मनोहरभाई जंयती निमित्त मध्यप्रदेशातील नेत्यांचीही पहिल्यांदाच हजेरी

मनोहरभाई जंयती निमित्त मध्यप्रदेशातील नेत्यांचीही पहिल्यांदाच हजेरी

गोंदिया) : शिक्षणाच्या क्षेत्रात आज महत्वपुर्ण परिवर्तन झाले असून आधी आपण शिक्षण घेण्यासाठी शाळेत जायचो आज मात्र ज्ञान घेण्यासाठी शाळेत जातो.ती बाब आजपासून ५०-६० वर्षापुर्वी मनोहरभाई पटेलांनी कळली आणि त्यांनी एकाच दिवसात तत्कालीन भंडारा जिल्ह्यात गोंदिया शिक्षण संस्थेची स्थापना करुन २२ शाळा महाविद्यालये उघडून शिक्षणाची दारे उघडली.फक्त चौथीपर्यंत शिक्षण घेतलेल्या मनोहर पटेलांनी समाजसेवेसाठी राजकारण स्विकारुन राजकारणलाच समाजसेवा ठरवित कार्य केले.

सध्याची पिढी ही पुस्तकी ज्ञानाची पिढी राहीली नसून ती संगणकासोबत चालणारी पिढी आहे.त्यामुळे शिक्षण संस्थांनी आपल्या शिक्षणात परिवर्तनही करणे तेवढेच महत्वाचे आहे.आपला देश हा शिक्षण,संस्कृती व मुल्यावर अवलबूंन असून देशात कितीही विभीन्नता असली तरी ती संस्कृती व मुल्याच्या आधारे टिकून आहे.देशात विविध धर्म,पंथ,अनेक भाषा असतांनाही आज एकता आहे ही एकता टिकविण्यासाठी या पिढीने संगणकीय ज्ञानासोबतच संस्कृती मुल्य जोपासले पाहिजे.गोंदिया माझ्याकरीता नवीन नसून माझे जुने संबध या शहराशी आहे.त्यामुळे गोंदिया-बालाघाट या जिल्हयातील कुणीही शेतकरी सिंचनाच्या पाण्यापासून व पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याची ग्वाही देत रखडलेल्या qसचन योजनावंर सकारात्मक पुढाकार घेतले जाईल असे आश्वासन देत हे सर्व प्रश्नच सोडवायचे असतील तर गोंदिया जिल्ह्याल्याच मध्यप्रदेशात समाविष्ठ करुन टाका असे विचार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी व्यक्त केले.


ते येथील डी.बी.सायंस महाविद्यालयाच्या प्रागंणात आयोजित स्व.मनोहरभाई पटेल यांच्या ११३ व्या जयंती समारोह व सुवर्ण पदक वितरण कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार प्रफुल पटेल होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेते संजय दत, उद्योगपती अनिल अग्रवाल,किरण अग्रवाल,मध्यप्रदेशचे मंत्री प्रदीप जायस्वाल, म.प्र. विधानसभेचे उपाध्यक्ष हिना कावरे, खासदार मधुकर कुकडे, काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नाना पटोले, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार गोपालदास अग्रवाल,प्रकाश गजभिये,नगराध्यक्ष अशोक इंगळे, जि.प.अध्यक्ष सीमा मडावी, रमेश डोंगरे, विलासराव श्रृंगारपवार,माजी खा.विश्वेश्वर भगत, माजी मंत्री नाना पंचबुद्धे,आ. संजय उईके, माजी आ. अनिल बावणकर, रामरतन राऊत, सेवक वाघाये, माजी आ. दिलीप बन्सोड, अकादमीच्या अध्यक्ष वर्षाताई पटेल,हरिहरभाई पटेल,पुष्पा कावरे उपस्थित होते.
सुरवातीला मनोहरभाई पटेलांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन व दिपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ व पाहुण्यांच्या हस्ते गुणवंताचा सत्कार सुवर्णपदकाने करण्यात आला.
प्रास्तविकपर अध्यक्षीय भाषणात प्रफुल पटेल यांनी गोंदिया शहराच्या विकासात कमलनाथ यांचे राहिलेले मोलाचे योगदान शहरवासी कधीच विसरणार नसल्याचे सागंत तालुक्यातील डांगुर्ली सिंचन योजनेकरीता मध्यप्रदेश सरकारने तत्काळ मंजुरी दिल्यास गोंदिया व वारासिवनी तालुक्यात सिंचन क्रांती होणार असे म्हणाले.मनोहरभार्इंनी त्याकाळी सुरु केलेल्या शिक्षण संस्थेत ६० हजारावर कर्मचारी नोकरी करीत असून दीड लाखावर विद्यार्थी विदर्भातील महाविद्यालय,शाळामध्ये शिक्षण घेत असल्याचे म्हणाले.त्याचप्रमाणे उद्योगपती अनिल अग्रवाल यांनी आमच्या जिल्हयातील गौणखनिज संशाधनाचा वापर करुन याठिकाणी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही आवाहन केले.मुख्यमंत्री कमलनाथ आमचे मार्गदर्शक असून त्यांनी मागास भागाच्या विकासात हातभार लावावे असे सांगत संजय दत्त यांच्यापासून नव्या पिढीला ऊर्जा मिळेल अशी आशा व्यक्त केली.

Report : Anmol Patle

Please follow and like us:
189076

Check Also

Breaking News : पत्नीने पतीचा वध केला, पत्नी अटक

कलयुगी पत्नी ने जमीन के लालच में पहले तो अपने पति की निर्ममता से हत्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy khabar 24 Express? Please spread the word :)