Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व अधिकारी यांची खासदारांसोबत बैठक

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक व अधिकारी यांची खासदारांसोबत बैठक

मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धरमवीर मीणा यांनी मुख्य विभागप्रमुख, नागपूर व भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांच्या समवेत दिनांक २३ मे २०२५ रोजी “समाधान” कॉन्फरन्स हॉल विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, नागपूर येथे नागपूर व भुसावळ विभागातील माननीय खासदारांसमवेत बैठक घेतली.
या बैठकीस माननीय खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव (धुळे), राजाभाऊ (पराग) प्रकाश वाजे (नाशिक), भास्कर मुरलीधर भागरे (दिंडोरी), बळवंत बसवंत वानखेडे (अमरावती), बंटी विवेक साहू (छिंदवाडा), श्यामकुमार बर्वे (रामटेक), संजय उत्तमराव देशमुख (यवतमाळ-वाशीम), दर्शनसिंह चौधरी (होशंगाबाद), अमर शरद राव काळे (वर्धा) व अनुप संजय धोत्रे (अकोला) यांनी सहभाग घेतला. या समितीचे अध्यक्षपद सर्वानुमते अनुप धोत्रे यांची निवड करण्यात आली.
यापूर्वी महाव्यवस्थापक मीणा यांनी माननीय खासदारांचे शाल व श्रीफळ देऊन स्वागत केले. आपल्या स्वागतपर भाषणात त्यांनी विविध प्रकल्पांची यशस्वी पूर्तता व प्रवाशांच्या सेवेसाठी केलेल्या प्रयत्नांमध्ये खासदारांच्या सहकार्याचे व प्रोत्साहनाचे कौतुक केले. त्यांनी मध्य रेल्वेच्या विविध यशोगाथांचा उल्लेख करताना प्रतिष्ठित जी. बी. पंत शील्ड, तसेच प्रथम व द्वितीय नवोन्मेष पुरस्कार मिळाल्याचा उल्लेख केला.
बैठकीचे संचालन के. के. मिश्रा, उपायुक्त महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे यांनी केले.
नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्री विनायक गर्ग व भुसावळच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पांडे यांनी नागपूर व भुसावळ विभागांच्या यशस्वी कार्यांची सविस्तर माहिती सादर केली.
खासदारांनी त्यांच्या मतदारसंघांतील विविध मागण्या मांडत प्रवाशांच्या सुविधा सुधारण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुचवल्या त्यांनी रेल्वेने राबवलेल्या अमृत भारत स्टेशन योजना, वंदे भारत एक्सप्रेस, अमृत भारत एक्सप्रेस व वंदे मेट्रो यांसारख्या योजनांमुळे प्रवाशांना होणाऱ्या लाभांचे कौतुक केले. खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देण्यात आली.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

See this news as well


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

Supreme Court Seeks Centre’s Response on Sonam Wangchuk’s Arrest, No Relief Granted Yet

Supreme Court Seeks Centre’s Response on Sonam Wangchuk’s Arrest, No Relief Granted Yet

Leave a Reply