जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तहसील कार्यालयात आज 1 आॅगस्ट रोजी महसुल दिन साजरा करण्यात आला. महसुल दिनानिमित्त मागच्या महसुल वर्षांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने, तहसीलदार दीपक धिवरे यांच्या हस्ते प्रशिस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमांमध्ये तहसीलदार दीपक धिवरे यांनी शासनाच्या कामकाजाच्या महत्त्वाचा अंग असणाऱ्या महसूल विभागाच्या मागील वर्षी केलेल्या कामकाज व येणाऱ्या वर्षात करावयाच्या कामकाजाचे नियोजन याबाबत मार्गदर्शन केले तसेच आधार कार्ड मतदार कार्ड बाबत जोडणी कार्यक्रमाचे औपचारिक शुभारंभ करण्यात आला, याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास महसूल नायब तहसीलदार अंगद आसटकर, निवासी नायब तहसीलदार शोभा घुले, महसूल सहाय्यक भगवान शिरसाठ तसेच सर्व नायब तहसीलदार, तलाठी, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, अव्वल कारकून, कोतवाल आदी उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ