Bhusawal Breaking News | Bureau Report Akash Dhake | Khabar 24 Express

अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार केंद्र शाखा भुसावळ यांच्या वतीने आयोजित बैठक उत्साहात व यशस्वीरित्या पार पडली. बैठकीस मोठ्या संख्येने सदस्य उपस्थित होते.
बैठकीत विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जळगाव जिल्ह्याचे जिल्हा सचिव राकेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीत भुसावळ तालुकाध्यक्षपदी निलेश कोलते यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी अमोल राऊत, सचिवपदी प्रमोद महाजन, सहसचिवपदी राहुल सपकाळे, खजिनदारपदी अनिस देशमुख यांची निवड झाली आहे. तसेच कायदेशीर सल्लागार म्हणून सागर बहिरुने व प्रकाश सरदार, प्रसिद्धी प्रमुख म्हणून आकाश ढाके व यश कोठारी यांची निवड करण्यात आली. वरणगाव शहर प्रमुखपदी श्री. निलेश पाटील यांची निवड करण्यात आली.
बैठकीच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व उपस्थित सदस्यांचे आभार मानण्यात आले. तसेच नव्याने निवड झालेल्या कार्यकारिणीला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express | India's Leading Hindi News Network Khabar 24 Express brings the latest Hindi News, Breaking News, Live TV, India News, Maharashtra News, Nagpur News, Politics, Crime, Business, Sports, Entertainment, Technology, Auto, Health, Education, Lifestyle and World News with fast, accurate and trusted updates 24×7