Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / महाराष्ट्र शासनातर्फे सेवा पंधरवड्याचा समारोप हतनूर आणि मांडवे दिगर येथे उत्साहात

महाराष्ट्र शासनातर्फे सेवा पंधरवड्याचा समारोप हतनूर आणि मांडवे दिगर येथे उत्साहात

आकाश ढाके, भुसावळ: महाराष्ट्र शासनातर्फे 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत राबविण्यात आलेल्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत आयोजित सेवा पंधरवड्याचा समारोप मौजे हतनूर आणि मांडवे दिगर येथे करण्यात आला. या समारोप कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री माननीय संजयजी सावकारे यांच्या प्रमुख उपस्थितीने पार पडला.

या कार्यक्रमात हतनूर गावात अतिक्रमण नियमन करून 140 लाभार्थ्यांना सातबारा उतारे वाटप करण्यात आले. तसेच मांडवे दिगर येथे गोरबंजारा जातीचे प्रमाणपत्र, विविध शैक्षणिक दाखले, तसेच विशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजना लाभार्थ्यांना मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

या वेळी भुसावळ तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांनी प्रास्ताविक सादर करून सेवा पंधरवड्यात महसूल प्रशासनाने गावोगावी जाऊन वंचित घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्याचा घेतलेला पुढाकार याबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यक्रमाच्या वेळी भुसावळ उपविभागीय अधिकारी श्री. जितेंद्र पाटील, गटविकास अधिकारी श्री. सचिन पानझडे, तसेच गावाचे सरपंच, पोलीस पाटील, ग्राम महसूल अधिकारी आणि मंडळ अधिकारी उपस्थित होते.

दोन्ही कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने हजेरी लावली आणि शासनाच्या या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता; नगराध्यक्षपद आरक्षण जाहीर

दिवाळीनंतर दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता; नगराध्यक्षपद आरक्षण जाहीर

Leave a Reply