नूतन मराठा महाविद्यालय जळगाव येथे दि. २ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमा-अंतर्गत ग्रंथालय विभागात भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजीत केले होते. महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे १ ते १५ जानेवारी वाचन संकल्प महाराष्ट्राचा पंधरवाडा साजरा केला जात आहे. त्या अनुषंगाने शहरातील नुतन मराठा महाविद्यालयात भव्य ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात दुर्मिळ, ऐतिहासिक, कथा कादंबरी नावाजलेले पुस्तके प्रदर्शनाचे आकर्षण होते.
ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. जयंत लेकुरवाळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अशोक पाटील, प्रा. नागसेन पेंढारकर,नंदुरबार, प्रा. विशाल जाधव, प्रा. शरद भालेराव, डॉ. के. बी. पाटील उपप्राचार्य, डॉ. माधुरी पाटील, उपप्राचार्य , डॉ. डी.आर. चव्हाण, डॉ. एन.जे. पाटील, प्रा. आर.बी. देशमुख, डॉ. नुतन पाटील, प्रा. सुभाष वानखेडे, प्रा. डी.वाय. पाटील, प्रा. सनेर यावेळी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत डॉ. हेमंत येवले यांनी केले कार्यक्रमास यशस्वी होण्यासाठी विजय जगदाळे, अरविंद भोईटे, अविनाश पाटील, मोहनदास पाटील, श्रीमती पूजा झंझाणे, सौ. मेघमाला हांडे यांनी परिश्रम घेतले. तसेच यावेळी विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक व शिक्षेकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी उपस्थित झाले होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, जळगाव