
आकाश ढाके, भुसावळ: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील निष्ठावान व सक्रिय कार्यकर्ते धर्मराज तायडे यांची जिल्हा सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. ही घोषणा माजी मदत व पुनर्वसन मंत्री आमदार अनिलदादा पाटील आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आली.
या विशेष प्रसंगी पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिभाताई शिंदे, सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेश वानखेडे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पाटील, जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, शहराध्यक्ष संतोष चौधरी (दाढी) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
नियुक्तीनंतर आपले विचार व्यक्त करताना धर्मराज तायडे म्हणाले, “पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटना बळकट करण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने प्रयत्नशील राहीन. पक्षवाढीसाठी माझे योगदान सदैव राहील.”
धर्मराज तायडे यांच्या निवडीबद्दल शहर, तालुका आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.