धावत्या रेल्वेत २० वर्षीय तरुणीची छेड काढल्याची घटना चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान घडली आहे . याप्रकरणी दिनांक 5 जानवारी रोजी भुसावळ लोहमार्ग पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की पीडित २० वर्षीय तरुणी ही ट्रेन नं ११०७७ झेलम एक्सप्रेसच्या कोच नंबर बी २ मधून पुणे ते दिल्ली प्रवास करत असताना चाळीसगाव ते भुसावळ दरम्यान दिलजीत सिंग बलवान सिंग याने तरुणीची छेड काढत तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून जगजीत सिंग बलवान सिंग याच्याविरुद्ध कलम 354 अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती भुसावळ लोहमार्ग पोलिसांनी दिली.
रिपोर्टर – आकाश ढाके, भुसावळ