भुसावळ – दि.04.01.2023 रोजी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास दुसखेडा रेल्वे स्टेशन येथे गार्ड डयुटीकामी असलेले आर.पी.एफ. कर्मचारी यांनी 2 अज्ञात चोरट्यांना रेल्वेचे साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न करीत असताना पकडण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यातील एका अज्ञात चोरटयाने रेल्वेचे आर.पी.एफ. कर्मचाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला होता. त्यामध्ये त्यांच्या डाव्या दंडास जखम झाली आहे. त्याबाबत फैजपूर पोलीस स्टेशन येथे गुरनं 02/2023 भादंवि कलम 353,333,379,511,34 प्रमाणे 2 अज्ञात चोरटयांविरुध्द आज दि. 05.01.2023 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
नमुद गुन्हयाचे तपास करत असताना फैजपूर पोलीस स्टेशन व आर.पी.एफ. ची क्राईम ब्रांच यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दुसखेडा गावातील 2 संशयीत इसमांना तपासकामी ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्या कडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केले. त्यामुळे त्यांना सदर गुन्हयाचे तपासकामी अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हा उघडकीस आणण्याकामी श्री.एम. राजकुमार, पोलीस अधीक्षक जळगाव, श्री. चंद्रकांत गवळी अपर पोलीस अधीक्षक जळगाव, डॉ. कुणाल सोनवणे, उपविभागीय पोलीस अधिकारी, फैजपूर यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूर पोलीस स्टेशनकडील सपोनि आखेगावकर, पोउपनिरी लोखंडे, पोउपनिरी शेख, पोहेकॉ/701 गुलबक्ष तडवी, पोना /930 किरण चाटे, पोकॉ/252 चेतन महाजन व त्यांच्या सोबत आर.पी.एफ क्राईम ब्रांच भुसावळ रेल्वेचे पोनि श्री. एल.के. सागर, पोउनि प्रविण मालविय, सफौ/वसंत महाजन तसेच आर.पी.एफ. पोलीस स्टेशन भुसावळ चे पोनि श्री. गुर्जर यांनी सक्रीय सहभाग नोंदवला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोउपनिरी श्री. मोहन लोखंडे व पोकॉ/252 चेतन महाजन हे करीत आहेत.