Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ : महिलांच्या ‘दिवाळी गोड’ करणारा उद्योजक मेळावा, पाच ते सात लाखांची उलाढाल

भुसावळ : महिलांच्या ‘दिवाळी गोड’ करणारा उद्योजक मेळावा, पाच ते सात लाखांची उलाढाल

Report Akash Dhake | भुसावळ : प्रतिष्ठा महिला मंडळाच्या वतीने शहरातील ब्राह्मण समाज मंगल कार्यालयात आयोजित तिनदिवसीय महिला उद्योजक मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यातून महिलांना रोजगाराची संधी मिळाली असून त्यांच्या हाताची दिवाळी यंदा खरोखरच गोड झाली आहे.

या मेळाव्यात दिवाळी सणासाठी लागणाऱ्या वस्तू, घरसजावटीचे साहित्य, खाद्यपदार्थ आणि पारंपरिक वस्तूंची विक्री झाली. एकूण पाच ते सात लाख रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती आयोजकांनी दिली.

भुसावळ शहर आणि परिसरातील तब्बल 108 महिला उद्योजकांनी या मेळाव्यात सहभाग नोंदवला होता. त्यांच्या हातच्या वस्तूंना ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला.

मंत्री संजय सावकारे, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, डॉ. संगीता बियाणी आणि पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी मेळाव्यास भेट देऊन महिलांच्या उद्योगशीलतेचे कौतुक केले. मंत्री सावकारे म्हणाले, “महिलांच्या स्वावलंबनासाठी प्रतिष्ठा महिला मंडळाचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.”

मेळावा यशस्वी करण्यासाठी अध्यक्षा रजनी सावकारे यांच्यासह अनिता आंबेकर, सोनल महाजन, वैशाली सैतवाल, श्रद्धा चौधरी, राजश्री बादशाह, राजेश्री देशमुख आणि जयश्री चौधरी यांनी परिश्रम घेतले.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

सपा WhatsApp ग्रुप में हड़कंप! ‘Riya Live’ नाम से फैली सनसनी, हापुड़ से लखनऊ तक मचा बवाल

सपा WhatsApp ग्रुप में हड़कंप! ‘Riya Live’ नाम से फैली सनसनी, हापुड़ से लखनऊ तक मचा बवाल

Leave a Reply