
“भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी – नितीन पंडितराव केले, कोतवाल व खाजगी पंटर ₹73,000 लाच घेताना ACB ने रंगेहात पकडले. प्रशासनात खळबळ, वाळू वाहतुकीवर कारवाई सुरु”
Report Akash Dhake | भुसावळ – भुसावळ तहसील कार्यालयातील तलाठी – नितीन पंडितराव केले, संबंधित कोतवाल आणि एका खाजगी पंटराला लाचखोरी करताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) ने सोमवारी दुपारी ही कारवाई केली. आरोपींनी वाळू वाहतुकीसाठी कारवाई न करण्याच्या मोबदल्यात ₹73,000 मागितले होते.
माहितीनुसार, जिल्ह्यात वाळू वाहतुकीवर बंदी असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मौन संमतीने बिनधास्त वाहतूक सुरू होती. संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई न करण्यासाठी व वाहतूक सुरु ठेवण्यासाठी लाच मागितली. तक्रार मिळाल्यानंतर ACB आणि सापळा रचून आरोपींना रंगेहात पकडले.
ही कारवाई झाल्यानंतर भुसावळ प्रशासन आणि महसूल विभागात खळबळ उडाली आहे. प्रशासन आता वाळू वाहतुकीवर आणि लाचखोरी प्रकरणांवर कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे.
ACB कारवाईचे तपशील:
- ACB चे पोलिस उपअधीक्षक: योगेश ठाकूर
- अटक केलेले: तलाठी नितीन पंडितराव, संबंधित कोतवाल, खाजगी पंटर
- लाच रक्कम: ₹73,000
- ठिकाण: भुसावळ तहसील कार्यालय
भुसावळमधील वाळू वाहतुकीवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आता कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.
ब्यूरो रिपोर्ट : आकाश ढाके, खबर 24 एक्सप्रेस, भुसावळ
Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines
Subscribe to get the latest posts sent to your email.
Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines Khabar 24 Express Indias Leading News Network, Hindi News – Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines, current affairs, cricket, sports, business and cinema, Latest Hindi News, Breaking News in Hindi, Bollywood Gossip, Bollywood News, Top Hindi News Channel, Khabar 24 Express Live TV, Khabar24, Khabar24 Express