Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / भुसावळ अपहरण प्रकरणाचा उलगडा, पोलिसांच्या तात्काळ कारवाईने 5 वर्षीय मुलगी सुखरूप सापडली

भुसावळ अपहरण प्रकरणाचा उलगडा, पोलिसांच्या तात्काळ कारवाईने 5 वर्षीय मुलगी सुखरूप सापडली



भुसावळ | जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात 22 ऑक्टोबर 2025 रोजी घडलेल्या बालकाच्या अपहरण प्रकरणाचा उलगडा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला आहे. पोलिसांच्या तात्काळ आणि तांत्रिक तपासामुळे अपहृत मुलगी सुखरूप सापडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी काजल मुन्ना ठाकुर (वय 29, रा. भाखा अमरपूर, ता. थाना, जि. दिंडोरी, म.प्र.) यांच्या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण 22 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 ते 3 वाजताच्या दरम्यान भुसावळ बस स्टँड रोडवरील क्षेत्र प्रशिक्षण केंद्र (ATC) समोर करण्यात आले होते. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 491/2025 भा.दं.वि. कलम 137(2) अन्वये नोंद करण्यात आली होती.

तपासादरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा मागोवा घेतला. तपासात गोरेलाल भगवानसिंग कछवे उर्फ भिला (रा. अजदरा) हा आरोपी असल्याचे समोर आले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत उजनी देवस्थान, ता. बोदवड येथून आरोपीस ताब्यात घेतले. चौकशीत त्याने “भिक मागण्यासाठी” मुलीचे अपहरण केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी मुलीला सुखरूप शोधून तिच्या आईच्या ताब्यात दिले आहे. तपासात असेही स्पष्ट झाले की, आरोपीवर यापूर्वीही मध्य प्रदेशातील चैनपूर पोलिस ठाण्यात बालअपहरणाचा गुन्हा (कलम 363) नोंद आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन:
मा. पोलीस अधीक्षक जळगाव श्री. महेश्वर रेड्डी,
मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते,
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (भुसावळ विभाग) श्री. संदीप गावीत,
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (जळगाव विभाग) श्री. नितीन गणापुरे.

कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी:
स्थानिक गुन्हे शाखा पो.नि. श्री. राहुल गायकवाड, भुसावळ बाजारपेठ पो.ठा. पो.नि. श्री. राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. नितीन पाटील, पो.उप.नि. मंगेश जाधव, तसेच अनेक पोलीस कर्मचारी सहभागी होते.

सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. रमण सुरळकर करीत आहेत.

ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ

भुसावळ अपहरण, Bhusawal Kidnapping Case, Jalgaon Police News, Bhusawal Crime News, Maharashtra Police Investigation, Child Rescue News, Akash Dhake Report


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

महाराष्ट्र में महिला डॉक्टर की आत्महत्या, पुलिस अधिकारी पर गंभीर आरोप, हाथ पर लिखा दर्दनाक संदेश

महाराष्ट्र में महिला डॉक्टर की आत्महत्या, पुलिस अधिकारी पर गंभीर आरोप, हाथ पर लिखा दर्दनाक संदेश

Leave a Reply