Breaking News
BigRoz Big Roz
Home / Breaking News / गोंदिया जिल्हा पोलिसांकडून सायकल थॉन स्पर्धेचे आयोजन, शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

गोंदिया जिल्हा पोलिसांकडून सायकल थॉन स्पर्धेचे आयोजन, शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

लोकेशन : गोंदिया | ब्यूरो रिपोर्ट : अनमोल पटले : फिटनेस की डोज, आधा घंटा रोज! या टॅगलाईन अंतर्गत व फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह या उपक्रमाचा एक भाग म्हणून गोंदिया जिल्हा पोलिसांच्या वतीने पहिल्यांदाच सायकल थॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला गोंदिया शहर व जिल्ह्यातील शेकडो सायकलप्रेमींनी उपस्थित राहून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना जिल्हा पोलिस विभागाच्या वतीने प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक गौरख भामरे, पोलिस उप अधीक्षक अभय डोगरे तसेच गोंदियातील उपविभागीय पोलिस अधिकारी आणि पोलिस निरीक्षक स्वतः सायकल चालवत हेल्थ इज वेल्थ आणि पर्यावरण संरक्षणाचा संदेश देताना दिसून आले.

गोंदियातील सायकल संडे ग्रुप ने देखील या स्पर्धेत सक्रिय सहभाग घेतला. सायकलपटू परमजीत सिंग यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर उदयभान निर्वाण यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय स्थानावर नवीन दहिकर यांची निवड झाली. विजेत्यांचा सत्कार जिल्हा पोलिस अधीक्षक गौरख भामरे यांच्या हस्ते करण्यात आला.

शहरातील शेकडो सायकलपटूंनी या स्पर्धेत भाग घेऊन सायकलिंगचा आनंद घेतला आणि आरोग्य, फिटनेस तसेच पर्यावरण रक्षणाबाबत जागरूकतेचा संदेश दिला.


ब्यूरो रिपोर्ट : अनमोल पटले, गोंदिया


Discover more from Khabar 24 Express Indias Leading News Network, Khabar 24 Express Live TV shows, Latest News, Breaking News in Hindi, Daily News, News Headlines

Subscribe to get the latest posts sent to your email.

Check Also

सपा WhatsApp ग्रुप में हड़कंप! ‘Riya Live’ नाम से फैली सनसनी, हापुड़ से लखनऊ तक मचा बवाल

सपा WhatsApp ग्रुप में हड़कंप! ‘Riya Live’ नाम से फैली सनसनी, हापुड़ से लखनऊ तक मचा बवाल

Leave a Reply