भुसावळ नगर परिषद संचलित म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथील क्रीडा शिक्षक व महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ पुणे चे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष व विविध खेळांच्या राज्य व जिल्हा संघटनांचे सचिव डॉ. प्रदीप रवींद्र साखरे यांना पुणे येथे त्यांनी आजपर्यंतच्या केलेल्या सामाजिक, पर्यावरण, क्रीडा, शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. त्यांनी २०१४ पासुन सतत ७ वर्षे स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी व मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे यासाठी बेटी बचाव बेटी पढाओ अंतर्गत ८ मार्च महिला दिनी ज्या बालिका जन्माला येतात त्या बालिकांना व मातापित्यांचा बेबी किट , शॉल, श्रीफळ, नारळ व सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात येते. तसेच निसर्ग सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाच्या माध्यमातून वृक्षारोपण करणे, स्वतःच्या मुलीचा वाढदिवस तीच्या ४ थ्या वाढदिवसापासून ते ११ व्या वाढदिवसापर्यंत तीचा जो वाढदिवस तितके वृक्ष लावून साजरा करण्यात येतो. तसेच गरिबांना अन्नदान करतात, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले, गरीब विद्यार्थ्यांना वह्या व शालेय साहित्य वाटप केले. तसेच जिल्हा राज्य व राष्ट्रीय क्रीडा संघटनांचे विविध पदांवर करत असलेले कार्य व विविध राज्य , राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय स्पर्धांचे केलेले आयोजन व ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया द्वारे घेण्यात आलेल्या २००९ मध्ये इंडोअर एशियन गेम व ऑलम्पिक कौन्सिल ऑफ एशिया द्वारे चायना, थायलंड, व्हिएतनाम येथे घेण्यात आलेले बीच एशियन गेम्स, बँकॉक, सुभानपुरी, फुकेट थायलंड, बाली- इंडोनेशिया, लावोस, मलेशिया, चायना, अश्या विविध देशांमध्ये एशियन गेम, वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत भारतीय पेटांक्यू संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केले. २००३ ला पोखरा नेपाळ येथे झालेल्या सेव्हन ए साईड फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहिले व भारतीय संघाला गोल्ड मेडल प्राप्त झाले. शालेय राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेत नोडल ऑफिसर म्हणून काम पाहिले, शालेय राज्य स्पर्धेत निवड समिती सदस्य म्हणून काम केले. अश्या विविध कार्याची दखल घेऊन आंतरराष्ट्रीय न्यूट्रिशन अकॅडमी मलेशिया व अखिल भारतीय मारवाडी गुजराती मंच यांच्या द्वारा व मराठी सिनेअभिनेत्री मोनालिसा बागल व भारतीय मारवाडी गुजराती मंचाचे अध्यक्ष डॉ. अजित हुकुमचंद बागमार यांच्या हस्ते पुणे येथे ANAM PEACE AMBASSADOR ICONIC AWARD हा राष्ट्रीय स्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ