
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 व 11 फेब्रुवारी 2024 रोजी किनवट (जि. नांदेड) येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.
यंदाच्या बौद्ध धम्म परिषदेत पश्चिम महाराष्ट्रातील डॉ. निलेश राणे यांची विशेष उपस्थिती लक्षवेधक असणार आहे. राष्ट्रीय गुन्हे नियंत्रण संघटनेच्या (दिल्ली) राज्यमंत्रीपदी डॉ. निलेश राणे यांची नुकतीच नियुक्ती झालेली आहे. तसेच ते भारतीय क्रीडा विकास आणि पदोन्नती महासंघ (दिल्ली) चे राष्ट्रीय उपाध्यक्ष देखील आहेत. निलेश राणे युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांपर्यंत सेवा देण्याची धडपड डॉ. राणे करीत आहेत. त्यांच्या क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील कामाची दखल जगभरात घेतली जात आहे.
जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष श्री. कन्हैया कुमार यांची देखील डॉ.राणे यांच्यासोबत विशेष उपस्थिती असणार आहे. किनवटचे माजी नगराध्यक्ष मा.अरुण आळणे हे जागतिक बौद्ध धम्म परिषदेचे निमंत्रक तर आयोजक राहुल कापसे आहेत.
ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके, नाशिक