भुसावळ येथील रेल्वे सुरक्षा बल विभागाचे कर्मचारी डाँग स्कॉट (विरु) सह अकोला ते भुसावळ गांधीधाम एक्सप्रेस ट्रेन क्रमांक (२०८०३) मध्ये (ता.२७) रोजी ड्युटीवर असतांना आचेगाव स्थानकावर ट्रेन सुटताच डॉग वीरूने ट्रेनच्या ( एस ९) कोचच्या पुढच्या बाजूला वॉशरूम मध्ये २ बेवारस संशयास्पद गोण्या आढळून आल्या.
सदरील माहिती विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष मार्फत वरिष्ठांना कळवून भुसावळात फलक क्रमांक ४ वर उतरविण्यात आल्या-असून सीसीटीव्हीच्या सर्व्हर रूममध्ये ठेवण्यात आल्या होत्या.
सदरील २ गोण्या नायब तहसीलदार, उपनिरीक्षक तसेच छायाचित्रकार यांच्या समक्ष उघडले असता १३ बंडल २६ किलो गांजा मिळून आला.
माहिती अशी की, गांधीधाम एक्सप्रेस ट्रेन क्रमांक (२०८०३) मध्ये हेड कॉन्स्टेबल संजय पाटील आणि हेड कॉन्स्टेबल जितेंद्र इंगळे हे त्यांच्या डॉग स्कॉट वीरू सह अकोला ते भुसावळ ड्युटीवर तपासणी करीत असतांना
आचेगाव स्थानकावरून ट्रेन सुटताच, डॉग वीरूने ट्रेनच्या (एस ९) कोचच्या पुढच्या उजव्या बाजूला असलेल्या वॉशरूममध्ये २ बेवारस संशयास्पद गोण्या आढळून आली. याची माहिती विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्ष भुसावळ यांच्यामार्फत श्री. आर. के. मीना निरीक्षक भुसावळ स्टेशन यांना देण्यात आली.
माहितीच्या आधारे भुसावळ रेल्वे स्थानकाच्या फलक क्रमांक ४ वर गाडी येताच निरीक्षक आर.के.मीना, उपनिरीक्षक के.आर. तरड, उपनिरीक्षक अनिल कुमार तिवारी, उपनिरीक्षक विनोद खरमाटे SIB/BSL, ASI- वसंत महाजन CIB/ बीएसएल, एचसी- विजय पाटील, एचसी- योगेश पाटील आणि जीआरपी भुसावळचे एचसी धनराज लुले या ट्रेनच्या कोचमध्ये उपस्थित होते.
फलक क्रमांक ४ वरील दोन बेवारस संशयास्पद गोणी उतरवल्यानंतर नायब तहसीलदार भुसावळ सौ. शोभा राजाराम घुले यांना उपनिरीक्षक केशरा राम तरड, वजन काटा, छायाचित्रकार, भुसावळ रेल्वे यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आले.
स्टेशनच्या फलक क्रमांक ४ वरील सीसीटीव्हीच्या सर्व्हर रूममध्ये ठेवलेल्या गोण्यामधील १३ बंडल उघडले असता त्यामधून आंबट उग्रवास आणि त्यात बिया असलेला ओला गांजा दिसला. सदरील गांजाचे वजन २६,२५८ किलो असल्याचे आढळून आले, ज्याची अंदाजे एकूण किंमत २,६२,५८० /- रुपये एवढी आहे.
सदर प्रकरण पुढील कार्यवाहीसाठी ग्रा.पं.भुसावळकडे सोपविण्यात येणार आहे.
सदरील कारवाई विभागीय सुरक्षा आयुक्त एच.श्रीनिवास राव, सहायक सुरक्षा आयुक्त भुसावळ अशोक कुमार, आर पी.एफ. निरीक्षक स्टेशन राधा किशन मीना यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के.आर. तरड यांनी केली आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ