
भुसावळ येथील बडा सेवा मंडळ भागातील सुरेश द्वारकादास डिंगरिया यांच्या मातोश्री मोहिनीबाई यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले, यावेळी डिंगरिया परिवारातील रामचंद्र डिंगरीया, कैलास डिंगरीया, गिरीश सुरेश डिंगरीया यांनी पर्यावरण जागरण प्रतिष्ठानचे नाना पाटील सर यांनी केलेल्या आवाहनानुसार आई मोहिनीबाई यांच्या स्मृती चे वृक्ष सिंधी अमरधाम मध्ये लावण्यात आले यामुळे जलप्रदूषण ही वाचले व या स्मृतीक्षामुळे आईचे स्मृती कायम राहावी या निमित्ताने त्या झाडाचे संगोपन संवर्धन ही होईल असे डिंगरिया परिवाराने सांगितले.
यावेळी पर्यावरण जागर प्रतिष्ठानचे नाना पाटील सर यांनी सिंधी समाजात प्रथमच डिंगरीया परिवाराने आईच्या स्मृतीचे वृक्ष लावले या वृक्षात आईची भावना रुजवल्याने त्या वृक्षाचे संवर्धन होईल व भविष्यातील येणारी पिढी सह डिंगरिया परिवाराला कायम आठवण राहील त्यांनी दिलेल्या प्रतिसादाला आवाहन दिल्याबद्दल नाना पाटील सर डिंगरिया या परिवाराचे आभार मानले.
या वृक्षारोपणाच्या वेळी सुरेंद्रसिंग पाटील, संत आसाराम आश्रमाचे सेवक मुरलीभाई लेखवाणी, नारायणदास छाबडीया, सुमित डिंगरिया व डिंगरीया परिवाराचे सदस्य उपस्थित होते.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ