गेल्या अनेक वर्षापासून साईनिर्मल फाउंडेशन , श्री नरेंद्र मोदी विचार मंच च्या व इतर अनेक विविध सामाजिक राजकीय संस्थांच्या माध्यमातूनव इतर विविध संस्थांचे विविध पद भूषवित असलेले सामाजिक, सांस्कृतिक राजकीय क्षेत्रात कार्यरत असलेले भुसावळ शहरातील समाजसेवक शिशिर दिनकर जावळे यांना राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक क्रांतिकारी सेवा व समर्पित भावनेने विविध क्षेत्रात सेवावृत्ती कार्य केल्याबद्दल तसेच सामाजिक बांधिलकी आणि सामीलकी याची जाण आणि भान ठेवून राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच त्यांचं कार्य निस्वार्थ सेवेने करीत असल्याबद्दलव त्यांनी जोपासलेला सेवाभावी वृत्तीचा समाजसेवेचा तसेच आदर्श रचनात्मक कार्याचा गौरव व्हावा म्हणून पद्मश्री डॉक्टर मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट , एन वाय के क्रीडा मंत्रालय भारत सरकार व नीती आयोग दिल्ली, आय एस .ओ. नामांकित संस्थेच्या वतीने व डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र उरळी कांचन यांच्या सहकार्याने भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न अवॉर्ड 2023 हा पुरस्कार नुकताच जाहीर करण्यात आलेला आहे. राष्ट्रभक्तीची ज्योत तेवत ठेवण्यासाठी हा पुरस्कार तिच्या माध्यमातून राष्ट्रसेवा घडावी या उद्देशाने हा पुरस्कार 31 ऑक्टोबर 2023 रोजी पुण्यामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत शिशिर जावळे यांना हा प्रतिष्ठित मानाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ