भुसावळ शहरातील चोरीस गेलेल्या दाखल गुन्ह्यातील मोटारसायकली काही इसम बिनधास्तपणे शहरात फिरवत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळल्यावरून बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हेशातील अधिकारी व अमलदारांचा योग्य त्या सूचना देऊन सात मोटारसायकल हस्तगत करण्यात आले
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मोटरसायकल चोरट्यांची टोळी जेरबंद करण्यात आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गुप्त बातमी दारामार्फत माहिती मिळाली की, भुसावल बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मोटरसायकल संदर्भात गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सूचना देऊन शोध घेण्यास सांगितले असता एक संशयित इसम हा लाल रंगांची बिना नंबरची प्लेटिना गाडी सह मिळून आला. सदर इसमास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव सैय्यद शहर रहेमान वय २९ राहणार पंचशील नगर असे सांगितले कागदपत्र विचारणा केली असता सदर गाडी त्याने जळगांव शहरातून चोरी केली आहे. त्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांचे नावे दानिश उर्फ गोलू शरीफ खान वय २४ राहणार दीनदयाल नगर भुसावळ, कामीलोद्दीन अजिजुद्दीन वय ३० राहणार फैजपूर ता यावल यांना ताब्यात घेऊन त्यांनी भुसावळ, जामनेर, अमळनेर येथून चोरी केल्याचे सांगितले. पोलिसाना खाकी दाखवितात त्यांनी बजाज प्लसर गाडी क्रमांक एम. एच. १९. डी. डी. ४०३९ सुजूकी गॅसेस एम. एच. १९. डी. झेड. ४२२२, बजाज प्लॅटीना एम.एच.१५. डी. टी. ३३११ ( बाजारपेठ पो.स्टे.) बजाज प्लॅटीना एम. एच. ए. डी. जी. ८६७६ ( शहर पोलीस स्टेशन) बजाज प्लॅटीना एम. एच. १९. एफ. के २३२० शहर पोलीस स्टेशन) बजाज प्लसर गाडी क्रमांक एम. एच. १५.ई.सी. ८३४२ (जामनेर पोलीस स्टेशन) हिरो स्प्लेंडर और स्मार्ट एम.एच.१९ सी. डी. ०६५२ (अमळनेर पोलीस स्टेशन) अशा चोरी केलेल्या सात मोटारसायकली हस्तगत करण्यात आलेल्या आहेत. सदर आरोपीना अटक करण्यात आली असून मा.न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी मिळालेली आहे.
पुढील तपास पोहेकॉ विजय नेरकर करीत आहे. सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी उपविभागिय अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोपो उप निरी, गंगेश जाधव, पोहेकॉ विजय नेरकर, सुनील जोशी रमण सुरळकर, उमाकांत पाटील, निलेश चौधरी, यासीन पिंजारी, महेश चौधरी, पोकों प्रशांत परदेशी योगेश माळी सचिन चौधरी अशांनी मिळून केली.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ