भुसावल येथील सिद्धिविनाय कॉलनी येथे, कंटेनर डेपो जवळ वरणगांव रोड येथे कुत्र्यांनच्या हल्ल्यात मोर जखमी आहे, जागरुक नागरिक आशीष तिवारी यांनी वन्यजीव संस्थेचे पदाधिकारी रोहित महाले यांच्याशी संपर्क केला व वन्यजीव संरक्षण संस्थचे उपाध्यक्ष विजय रायपुरे यांना संपर्क केला असता ते लगेच घटना स्थळी पोहचले,
संस्थेचे डॉ. भरत महाजन यांनी प्रथमो- उपचार केला. कृष्णा साळी, चेतन ठाकुर, मनजीत भीमा कोळी, गोलू शिंदे, यश बानाईत, अनिकेत साली, अनिकेत राजपूत यांनी सहकार्य केले. वनरक्षक मारोती गालेकर , तुषार भोळे हे उपस्थित होते. फोन वर वनपाल चौधरी यांच्याशी विजय रायपुरे यांनी चर्चा करून जळगांव येथे वन्यजीव संरक्षंण संस्थेचे संस्थापक बाळकृष्ण देवरे यांचेशी संपर्क करून पुढील उपचासाठी जळगाव येथे महाबळ पशुवैद्यकीय दवाखाना येथे सर्जरीसाठी हलविण्याचे सांगण्यात आले.
ब्यूरो रिपोर्ट आकाश ढाके, भुसावळ