दि. 20/05/2023 रोजी रात्री 22.00 ते 22.30 वाजेच्या दरम्यान यातील फि.दी नामे संदीप प्रकाश लंवगे रा. मच्छी वाडा, पंचशिल नगर, भुसावळ जि. जळगांव याने यातील आरोपी नामे आकाश ऊर्फ चॅमपीयन शाम इंगळे रा. पंचशिल नगर, भुसावळ जि. जळगांव यास त्याने बांधकामास लागणारे सेंट्रींग प्लेट्स चे भाडे 2,000/- रुपये मागीतले असता त्यास पैसे मागण्याचा राग आल्याने त्याने फि.दी संदीप प्रकाश लंवगे व जखमी साक्षीदार नामे संतोष प्रकाश लंवगे अंशाना शिवीगाळ करुन घरी पळत जावुन हातात चाकु घेवुन येवुन फि.दी व साक्षीदार अंशाना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने साक्षीदार संतोष प्रकाश लंवगे याच्या गळ्यावर तसेच उजव्या हातावर चाकुने वार करून गंभीर दुखापत करून सदर ठिकाणाहुन पळुन गेला होता.
यातील फि.दी संदीप प्रकाश लंवगे यांनी दि. 21/05/2023 रोजी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या फिदीवरून यातील आरोपी नामे आकाश ऊर्फ चॅमपीयन शाम इंगळे रा. पंचशिल नगर, भुसावळ जि. जळगांव याच्या विरुध्द भादवि कलम 307 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्हयातील आरोपी हा गुन्हा घडल्यापासुन फरार झालेला होता. तो भुसावळ शहरात असले बाबत पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी स.पोलिस निरीक्षक हरीष भोये तसेच पोना. / 2816 निलेश बाबुलाल चौधरी, पोना./631 उमाकांत पन्नालाल पाटील, पो. का./3398 प्रशांत रमेश परदेशी, पो. का./293 योगेश नामदेव माळी, पो. का./2053 प्रशांत निळकंठ सोनार, पो. का./ 2820 सचिन यशवंत चौधरी अंशाना योग्य त्या सुचना दिल्याने वरील पोलीस स्टॉफ यांनी सदर गुन्हयातील आरोपी नामे आकाश ऊर्फ चॅमपीयन शाम इंगळे रा. पंचशिल नगर, भुसावळ जि. जळगांव यास भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनी परिसरातुन सापळा रचुन ताब्यात घेतले आहे.
सदरची कारवाही पोलीस अधिक्षक एम. राजकुमार जळगाव जिल्हा तसेच अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी जळगाव जिल्हा व उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे भुसावळ भाग भुसावळ यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, सहा. पोलीस निरीक्षक हरीश भोये, पोना. / 2816 निलेश बाबुलाल चौधरी, पोना. /631 उमाकांत पन्नालाल पाटील, पो. का./3398 प्रशांत रमेश परदेशी, पो. का./293 योगेश नामदेव माळी, पो. का./2053 प्रशांत निळकंठ सोनार, पो. का./2820 सचिन यशवंत चौधरी अशांनी केली आहे.
ब्यूरो रिपोर्ट – आकाश ढाके, भुसावळ